Ramnagar police arrest accused who spread terror by carrying sword
चंद्रपूर :- शहरातील दत्त नगर नगर वार्डात हातात तलवार घेऊन काही गुन्हा करण्याच्या तयारीत असणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 22 वर्षीय युवकास रामनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. spread terror by carrying sword
दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी रामनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी स्टाफ हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना रात्रो अंदाजे 8 वाजता चे सुमारास त्यांना मुखबीरव्दारे खबर मिळाली की, नागपूर रोड, दत्त नगर वार्ड, भारत फोम दुकानाचे मागे एक इसम हा त्याचे हातात एक लोखंडी तलवार घेवून वार्डात दहशत पसरवून काही गुन्हा करण्याचे उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी, आम रस्त्यावर फिरत आहे, Chandrapur Crime
अशा माहिती वरून सदर घटनेचे गांर्भीर्य लक्षात घेवून रामनगर गुन्हे शोध पथकाने Ramnagar Police Station DB Scott तात्काळ घटनास्थळी जावून आरोपी प्रेम अमर बोपारे (25 वर्ष) रा. दत्तनगर वार्ड, नागपूर रोड, चंद्रपूर हयास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातुन एक धारधार स्टिल मुठ असलेली लोखंडी तलवार जप्त करून त्यास पुढील कार्यवाहीस ताब्यात घेवून त्याचे विरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अप कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा सह कलम 135 मपोका अन्वये गुन्हा नोद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक असीफराजा शेख, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे प्रमुख सपोनी देवाजी नरोटे, सपोनी उगले, पोहवा पेत्रस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आनंद खरात, प्रशांत शेंद्रे, लालु यादव, मनिषा मोरे, हिरालाल गुप्ता, रविकुमार डेंगळे, प्रफुल पुष्पलवार, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, ब्युल्टी साखरे यांनी केली.
