Solve the water problem in the city
Municipal Corporation Reminder of Vanchit Mahila Aghadi
चंद्रपूर :- शहरातील पाणी पुरवठा नियमित करावा यासाठी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या वतीने मनपा आयुक्त यांना वारंवार निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली परंतु यावर मनपा प्रशासनाने विशेष दखल न घेतल्याने महिला आघाडीच्या माध्यमातून मनपा उपयुक्ताना स्मरणपत्र देण्यात आले.
वंचीत बहुजन महिला आघाडी महानगर चंद्रपूर VBA Women’s wing च्या वतीने अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांना मागे दिलेल्या अनेक निवेदनाचे समरण पत्र देण्यात आले त्यामध्य विशेषतः नागीणाबाग परिसरातील महात्मा फुले चौक सुशोभीकरण करण्यात यावे, सुगत नगर नगीनाबाग येथील 15 वर्षापासून रखडलेला नाल्याचा प्रश्न मार्गी लावावा तसेच चंद्रपूर महानगरातील पाण्याची समस्या सोडवावी या मागणीचे निवेदन स्मरणपत्र स्वरूपात सादर करण्यात आले. Solve the water problem in the Chandrapur city
निवेदन सादर करताना वं.बु.आ चंद्रपूर महानगर महिला अध्यक्ष तनुजा रायपूरे, महानगर उपाध्यक्ष सुलभा चांदेकर, महानगर उपाध्यक्ष इंदुताई डोंगरे आदी महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
