Excitement in education department :: 2 Z. P. extension officers and retired employees of education department in ACB
चंद्रपूर :- जिल्हा परिषद शिक्षण विभागातील (माध्यमिक) दोन विस्तार अधिकारी व एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कारवाई केली यामुळे शिक्षण विभागात खळबळ माजली. ACB Trap
शहरातील एका कॉम्पुटर इन्स्टिट्यूट संचालकाला आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकवणी करीता नवीन मराठी, इंग्रजी व हिंदी GOC and TBC Computer Typing कोर्स सुरु करायचे असल्याने शासन मान्यते करीता जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) येथे रीतसर अर्ज दाखल केला परंतु शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी सावन चालखुरे व विस्तार अधिकारी लघुत्तम राठोड यांनी शिक्षणाधिकारी मॅडम 70 हजार रुपयांची लाच मागत असल्यामुळे सदर रक्कम दिल्याखेरीज तुमचे काम होणार नाही असे सांगून 70,000 लाचेची मागणी केली. Anti Corruption Beuro Chandrapur
कॉम्पुटर इन्स्टिट्यूट चे संचालक यांना विस्तार अधिकाऱ्यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे दिनांक 31 जुलै 2024 रोजी तक्रार नोंदविली.
प्राप्त तक्रारीवरून अँटी करप्शन ब्युरो ने वेळोवेळी पडताळणी केली, कार्यवाही दरम्यान विस्तार अधिकारी सावन चालखुरे आणि लघुत्तम राठोड यांनी तक्रारदार यांना त्यांचा प्रस्ताव शासनास मंजुरीकरीता पाठविण्याकरीता 70,000/ रू. लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती 50,000/- रू. लाच स्विकारण्याचे मान्य केले व जिल्हा परिषद (प्राथ) सेवानिवृत्त जेष्ठ सहाय्यक महेश्वर फुलझेले यांनी लाच रक्कम देण्यास अपप्रेरणा दिली. यावरून आज तिन्ही आरोपीना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरू आहे.
सदरची कार्यवाही श्री. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, सफौ रमेश दुपारे, पोहवा अरूण हटवार, पोहवा नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, पोशि वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदिप ताडाम, राकेश जांभुळकर, म.पो.शि. मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, चापोशि सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर तसेच चापोशि रवि तायडे, मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.