Start bus service from village in Pombhurna taluka immediately
The statement of Shiv Sena taluka chief demanded Chandrapur bus depot chief
चंद्रपूर :- पोंभुर्णा तालुका हा आदिवासी बहुल असून तालुक्याच्या शेवटच्या म्हणजेच वैनगंगा नदी पर्यंत असलेल्या नागरिकांना आरोग्याच्या, शासकीय कामकाजासाठी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच शालेय विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला येण्या आणि जाण्यासाठी सकाळची चंद्रपूर -पोंभुर्णा – नवेगाव मोरे – गोंडपिपरी या मार्गाची सकाळी 7:00 वाजताची बस आणि चंद्रपूर – पोंभुर्णा – नवेगाव मोरे – जुनगाव या मार्गाची बस 11:30 वाजता असल्यास याचा फायदा शालेय विद्यार्थ्यांना होणार यासाठी लवकरात लवकर बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी Shivsena (बाळासाहेब ठाकरे) शिवसेना पूर्व विदर्भ संघटक किरणभाऊ पांडव, जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला, विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर यांच्या मार्गदर्शनात महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, चंद्रपूर महानगर प्रमुख भरत गुप्ता यांच्या उपस्थितीत शिवसेना तालुका प्रमुख पोंभुर्णा पंकज वडेट्टीवार यांनी चंद्रपूर आगार प्रमुखांना निवेदनातून केली आहे. Start bus service from Navegav More
विशेष म्हणजे पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागासाठी सकाळी 7:00 वाजताची बस ही शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींना उपयोगी येईल आणि दुपारी 11:30 वाजताची बस ही शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींना आपल्या गावाकडे परत जाण्याकरिता या वेळेसच्या बसेस सुरू झाल्याने याचा लाभ शाळा, कॉलेज च्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना, ज्येष्ठ नागरिक, इतर प्रवाशांना होईल. त्यामुळे या बसेस लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या अशी चर्चा सुध्दा यावेळी करण्यात आली.
निवेदन देते वेळी शिवसेना शहर प्रमुख वाणी सादालावार, युवासेना पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी आदींची उपस्थित होती.