Saturday, January 18, 2025
HomeAssembly Electionशेतकरी संघटना व भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

शेतकरी संघटना व भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Shetkari organization and BJP workers join Congress

आ. सुभाष धोटेंकडे युवकांचा कल : वनोजा शे. संघटना व भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश.

वनोजा यु. काँ. अध्यक्षपदी सचिन लोहे तर उपाध्यक्षपदी सौरभ पेटकर, राजेश माशिरकर यांची नियुक्ती.

चंद्रपूर :- कोरपणा तालुक्यातील मौजा वनोजा येथील शेतकरी संघटना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. Youths are attracted towards MLA Subhash Dhote

यामध्ये सचिन लोहे, सौरभ पेटकर, राजेश मासिरकर, सौरभ मत्ते, अजय लोहे, राकेश नागभिडकर, सुभाष भोयर, भाविक दुर्गे, अविनाश भोयर, प्रफुल वेट्टी, निखिल पाचभाई, सारंग लोहे, अभिषेक लोहे, अतुल भोयर, पंकज पाचभाई, पवन पाचभाई, जीवन पाचभाई, संकेत भोयर, आशिष भोयर, आकाश भोयर, चेतन भोयर, प्रफुल भोयर, हर्षल मालेकर, आशिष माशिरकर, प्रशांत नवले, धीरज भेंडारे, सुमित चुनारकर, प्रजत चुनारकर, निखिल बावणे यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन सर्वांचे स्वागत केले.

यावेळी आ. सुभाष धोटे यांनी वनोजा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदी सचिन लोहे, उपाध्यक्ष सौरभ पेटकर, राजेश माशिरकर, सचिव अजय लोहे, सहसचिव राकेश नागभिडकर व अन्य सर्वांची सदस्य म्हणून निवड करून अभिनंदन केले.

यावेळी गावातील जेष्ठ नेते नत्थु मत्ते, भारत जीवने, एकनाथ भोयर, गुरुदास वरापे, यादव चुनारकर, संजय भोयर, गुणवंत वेटी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular