Shegaon police take action – seller arrested with 2 kg of ganja
चंद्रपूर :- शेगाव पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत 2किलो गांजा जप्त Narcotic marijuana करण्यात आला असून विक्रीसाठी साठा करून ठेवलेल्या आरोपीला एनडीपीएस कायद्या अन्वये अटक करण्यात आली आहे. Shegaon police take action – seller arrested with 2 kg of ganja (Narcotic Marijuana)
शेगाव पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चारगाव बुद्रुक येथील नितेश गौतम देठे (वय ३२) याच्या राहत्या घरावर छापा Police Raid टाकण्यात आला. शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनि योगेंद्रसिंह यादव, पंचासमक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांच्या मदतीने घेतलेल्या झडतीत दोन पिशव्यांमध्ये पॅक केलेले गांजाचे दोन पॅकेट आढळून आले. यात 2 किलो गांजाचा पंचनामा करून जप्त करत आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक १६७/२५ कलम ८(क), २०(ब) NDPS Act नुसार गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. Shegav Police Station
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर दिनकर ठोसरे यांच्या प्रत्यक्ष हजेरीत शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंह यादव, पो.उपनिरीक्षक सुमित कांबळे, सहा. फौजदार बंडू मोहुर्ले, पोहवा दिनेश ताटेवार, छगन जांबुडे, प्रफुल कांबळे, ज्ञानेश्वर केकान, चालक रामेश्वर भिसे, प्रगती भगत तसेच LCB स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पो.उ.नि. सर्वेश बेलसरे, नितीन कुरेकर, नितीन साळवे, प्रमोद कोटणाके, गजानन मळावी व अमोल सावे यांनी केली.