चंद्रपूर : चंद्रपूर–बल्लारपूर मार्गावरील विसापूर टोलनाक्याजवळ दिनांक 17 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान महाकाली मातेच्या दर्शनासाठी रात्री पायी जाणाऱ्या भाविकांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याची चर्चा सुरू आहे. कार्तिक जाधव या नऊ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याला ओढत नेल्याचे सांगितले जात आहे. Leopard Attack
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने बालकाला ओढत नेल्याचे लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरड करून घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची हालचाल पाहून बिबट्याने बालकाला सोडून दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर नागरिकांनी बालकाला तातडीने पोलिसांच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. Leopard attacks child near Visapur
या घटनेमुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे विसापूर परिसरातून महाकाली मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करताना भाविकांनी सावधगिरी बाळगावी, लहान मुलांना जवळ ठेवावे आणि शक्यतो समूहाने प्रवास करावा असे आवाहन करण्यात येत आहे