Elgar of Agriculture Clerk for pending demands Strike of officers – employees
• शेतकऱ्यांच्या अनुदानबाबीवर परिणाम
चंद्रपूर :- कृषी सहसंचालक (आस्थापना) हे पद लिपिक संवर्गातील आहे. या पदावर शासनाने तांत्रिक अधिकाऱ्यांची पदस्थापना केली आहे. शासनानेच नियमांना बगल दिल्याचा आरोप करीत कृषी लिपिकांनी राज्यभरात बेमुदत कामबंदचा एल्गार पुकारला आहे, त्याच धर्तीवर चंद्रपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात चंद्रपूर जिल्हाभरातील लिपिक वर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले. Strike of Agriculture Clerks कृषी लिपिकांचे कामबंद आंदोलन
कृषी विभागातील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यात वरिष्ठ प्रशासन अधिकारी हे कृषी सहसंचालक आस्थापना या पदासाठी पात्र असतानाही पद रिक्त आहे. शासन हेतु पुरस्सर त्यांना पदोन्नतीने अप्पर संचालक या तांत्रिक पदावर पदस्थापना देऊन अन्याय करीत असल्याचा आरोप आहे. या संदर्भात शासनाशी पत्रव्यवहार केल्यानंतरही दखल घेतली गेली नाही. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविल्याचा आरोप कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेने केला आहे. काँग्रेस पक्षात घराणेशाही, चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
या मागणीसाठी संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनात लिपिकवर्गीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अनुदान बाबी, पी.एम. किसान आदी योजनांवर होण्याची भीती आहे.
या आंदोलनात संघटनेचे चंद्रपूर जिल्हाभरातील कृषी विभागातील लिपिक सहभागी झाले आहेत.