Retirement ceremony at Ashram School concluded with enthusiasm; Tree plantation preserves memories
चंद्रपूर :- ऑगस्ट महिन्याची सुरुवात जिल्ह्यातील विविध आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाने झाली. आज स्वामी विवेकानंद आश्रमशाळा, किरमिरी येथे आयोजित समारंभात प्राथमिक मुख्याध्यापक श्री. दीपक धान्रोरकर आणि वसतिगृह कर्मचारी श्री. राजकुमार जुलमे यांचा ऐच्छिक सेवानिवृत्ती समारंभ साजरा करण्यात आला.
याचबरोबर श्रीराम अनुदानित आश्रमशाळा, गोजोली येथील वसतिगृह कर्मचारी श्री. राजू गिरसावळे आणि गोंडपिपरी येथील अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचारी श्री. सत्यवान झाडे यांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाली. या सर्वांचा सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार आणि विदर्भवादी नेते ॲड. वामनराव चटप, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. आशुतोषजी चटप, तसेच अनुदानित आदिवासी संघटना चंद्रपूरचे पदाधिकारी — अध्यक्ष श्री. प्रमोद साळवे, सचिव श्री. मनोज आत्राम आणि सल्लागार श्री. संतोष केशेट्टीवार — उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेतून शाळेच्या परिसरात विविध प्रकारची रोपटे लावण्यात आली. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आठवणी जपण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.