Saturday, January 24, 2026
HomeAcb Trapचंद्रपुर जिल्हयातील शासनाची RCMS ही अन्नधान्य वितरण प्रणाली तात्काळ सुरू करा

चंद्रपुर जिल्हयातील शासनाची RCMS ही अन्नधान्य वितरण प्रणाली तात्काळ सुरू करा

RCMS foodgrain distribution system of the government in Chandrapur district should be started immediately

चंद्रपूर :- चंद्रपुर जिल्ह्यात शासनाची (RCMS) रेशन कॉर्ड मॅनेजमेंट सिस्टम गेल्या काही दिवसांपासुन बंद आहे. त्यामुळे पुरवठा कार्यालयाचे ऑफीस लॉगिन, पब्लिक लॉगिन, बंद असून शिधापत्रिकांचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. शिधापत्रिकांचे कामकाज थांबल्याने सर्वसामान्य नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. चंद्रपुर जिल्ह्यातच नव्हे तर तहसील कार्यालयांमध्ये नागरीकांना त्रास होत आहे. RCMS foodgrain distribution system of the government in Chandrapur district should be started immediately

आरोग्याच्या सोयी-सुविधांसाठी १२ अंकी नंबर महत्त्वाचा असतो. पण तो नंबर नसल्याने अनेकांना याचा लाभ घेता येत नाही. शिवाय शिधापत्रिकांमधील दुरूस्त्या रखडल्या आहेत. वेबसाईट बंद असल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे.

करीता चंद्रपुर तालुक्यातील (RCMS) अन्नधान्य वितरण प्रणाली तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे Subhash Dhote यांनी महाराष्ट्राचे अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे Minister Dhananjay Munde यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular