Friday, September 4, 2026
HomeAccidentगणेशोत्सवात वीज सुरक्षेला प्राधान्य द्या

गणेशोत्सवात वीज सुरक्षेला प्राधान्य द्या

चंद्रपूर :- यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी वीज सुरक्षेची विशेष खबरदारी घ्यावी, तसेच उत्सवाच्या कालावधीत केवळ अधिकृत वीजजोडणीच घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून Msedcl करण्यात आले आहे. Prioritize elElectrical safety during Ganeshotsav

वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर.., 52 वाहनांवर कारवाई……

उत्सवादरम्यान वीज सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. Msedcl appeals to Ganesh Mandals  बल्लारपूरात पहिले जिल्हा आरोग्य साहित्य संमेलन……

गणेशमूर्तीच्या आगमन तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्ते आणि गल्लीबोदांमधील वीजवाहिण्यांची उंची लक्षात घेऊनच मूर्तीची उंची आणि रथाची रचना निश्चित करावी. वीजवाहिन्यांना मूर्ती, सजावटीचे साहित्य किंवा रथाचा कोणताही भाग स्पर्श होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरी घरफोडी, LCB च्या ताब्यात आरोपी……

गणेश मंडप उभारताना तसेच रोषणाईसाठी वीज यंत्रणेची मांडणी करतांना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे. वीज अपघात टाळण्यासाठी मंडपातील विद्युत व्यवस्था, रोषणाई आणि जोडणीची कामे केवळ प्रमाणित व कुशल विद्युत ठेकेदारांकडूनच करून घ्यावीत, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

चंद्रपुरात विदर्भ स्तरीय दहीहंडी स्पर्धा…….

गणेशोत्सव मंडळांसाठी तात्पुरती वीजजोडणी घेण्याची प्रक्रिया महावितरणने सुलभ केली आहे. मंडळांना महावितरणच्या अधिकृत मोबाईल ॲप किंवा ऑनलाईन संकेतस्थळावरून अर्ज करता येणार असून, त्याद्वारे तात्पुरती वीजजोडणी घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खासदारांचा ‘सरप्राइज विजिट’……

सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही गणेश मंडळाने अनधिकृतपणे वीज वापरू नये. तसेच वीजवाहिन्या आणि वीजखांबांजवळ मंडप उभारताना सुरक्षित अंतर राखावे. मंडप, कमानी, ध्वज, सजावटीचे साहित्य किंवा इतर वस्तू वीजवाहिन्यांच्या संपर्कात येणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular