Savitribai Phule Jayanti in excitement at Infant Convent
चंद्रपूर :- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे 3 जानेवारी 2025 ला बालिका दिन व स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून इयत्ता 9 वी मधील व स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी सकाळच्या परिपाठाचे सादरीकरण केले.
या दिनानिमित्ताने इयत्ता 1 ली मधील कुमारी शिवन्या तिवारी हिने सावित्रीबाई फुले यांच्याबाबत माहिती सांगितली. कु. स्वरा भुरे हिने कविता सादर केली. तसेच इयत्ता 5 वी मधील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांची वेशभूषा केली. तसेच इयत्ता 9 वी मधील कुमारी वृषाली पहानपट्टे या विद्यार्थिनीने एकपात्री नाटक आणि इयत्ता 8 वी मधील विद्यार्थिनींनी नृत्याचे सादरीकरण केले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौऱ भंगू ,मुख्याध्यापक रफिक अन्सारी, स्काऊट मास्टर सुभाष पिंपळकर गाईड शिक्षिका संगीता लांडे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली धानोरकर, संतोष सागर सर तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आनंदी लांडे व कु.ज्ञानदीप वांढरे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
