Friday, January 17, 2025
HomeIndustrialवेकोली मध्ये कार्यरत खाजगी खनन कंपन्यांमध्ये स्थानिकांचे प्रमाण त्वरीत वाढवा - हंसराज अहीर

वेकोली मध्ये कार्यरत खाजगी खनन कंपन्यांमध्ये स्थानिकांचे प्रमाण त्वरीत वाढवा – हंसराज अहीर

Rapidly increase the number of locals in private mining companies operating in Vekoli – Hansraj Ahir

चंद्रपूर :- जिल्हयातील WCL वेकोलि क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या खासगी ओबी (माती) कंपन्यांनी राज्यशासनाच्या स्थानिक पातळीवर रोजगार संदर्भातील ८० / २० अनुपात धोरणाशी अधिन राहून प्रकल्पग्रस्त क्षेत्रातील स्थानिक बेराजेगारांना सामावून घेण्यास प्राधान्यक्रम द्यावा व या संपूर्ण कार्यवाहीवर अंमल करवून घेण्याकरिता संबंधित शासकीय यंत्रणांनी नियंत्रण ठेवत या कंपन्याना स्थानिकांना रोजगार देण्यास बाध्य करावे असे सक्त निर्देश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी दिले आहेत.

स्थानिक शासकीय विश्रामगृहात दि २६ सप्टेंबर २०२४ रोजी वेकोलि वणी, माजरी व बल्लारपूर क्षेत्रीय कार्यालयाचे महाप्रबंधक व ओबी कंपन्याच्या व्यवस्थापनासोबत आढावा बैठक घेत आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी वेकोलिशी संबंधित विविध प्रश्न, समस्या व अन्य बाबींचा सविस्तर आढावा घेतला. उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यपूर्ततेबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.

या बैठकीस माजी आ. अॅड संजय धोटे, भाजपा नेते खुशाल बोंडे, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, रघुवीर अहीर, राजु घरोटे, मधुकर नरड, धनंजय पिंपळशेंडे, उमेश बोढेकर, पवन एकरे, राजेश तालावार, किशोर बावने, संजय तिवारी, सुदेश उपाध्याय, येनकच्या सरपंच कल्पना टोंगे, पाटाळाचे सरपंच विजयेंद्र वानखेडे, वेकोलि माजरीचे क्षेत्रीय महाप्रबंधक प्रमोद कुमार, वणी क्षेत्राचे आभासचंद्र सिंह, बल्लारपूर क्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे ऋतुराज सुर्य आदीची उपस्थिती होती. Suggestion for speedy acquisition of pending and vacant lands

वेकोलि प्रकल्पप्रभावित गावातील ओबीसी व अन्य प्रवर्गातील बेरोजगारांच्या रोजगारविषयक ओबी कपन्यांविषयी रोजगाराबाबत गंभीर स्वरूपाच्या तकारी प्राप्त झाल्याने ही आढावा बैठक घेण्यात आली यावेळी आयोगाद्वारे नव्याने प्रस्तावित खाणीबाबत तिन्ही वेकोलि क्षेत्राचा कार्य आढावा घेण्यात आला. उपस्थित वेकोलि अधिकाऱ्यांकडून अहीर यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली

Mungoli मुंगोली प्रकल्प सेक्शन-७ करीता प्रस्तावित झाल्याच, कोलगाव सेक्शन-९ करीता प्रस्तावित होत असल्याचे व गाडेगाव सेक्शन-९ करीता प्रस्तावित झाल्याची माहिती वेकोलि अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. वणी क्षेत्रातील ग्राम-मुंगोली पूनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे तसेच उकणीचे पुनर्वसन प्रस्तावित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आयोगास दिली. माजरी क्षेत्रातील मार्डा गावाच्या पुनर्वसनाची मागणी असल्याचे तसेच बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी सेंट्रल प्रकल्प सेक्शन-४ करीता प्रस्तावित झाल्याची माहिती वेकोलिने दिली. गोवरी-पोवनी एकत्रिकरण, बल्लारपूर नार्थ-वेस्ट सेक्शन-९ करीता प्रस्तावित असल्याची माहितीसुध्दा यावेळी देण्यात आली.

राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्षांनी या सर्व प्रकल्पातील पुनर्वसन प्रस्तावित गावातील १०% पेक्षा कमी उर्वरित जमिनींचे अधिग्रहण करून पुनर्वसन प्रकीयेला गती देण्याची सुचना उपस्थित क्षेत्रीय महाप्रबंधकांना दिल्या बैठकीमध्ये सर्वच प्रकल्पातील ५ वर्ष कालमर्यादा कारणास्तव प्रलंबित नोकरी प्रस्तावांचा सुध्दा अहीर यांनी आढावा घेतला. वेकोलि क्षेत्रात कार्यरत ओबी कंपन्यांमधील एकुण मनुष्यबळ त्यापैकी स्थानिकांची नोकरीतील टक्केवारी, एचपीसी नुसार वेतन, कामगाराकरिता वैद्यकीय सुविधा, विटीसी, पोलीस वेरीफिकेशन आदी बाबतही अहीर यांनी माहिती जाणून घेतली स्थानिकांना ८०% रोजगार देण्याकरिता शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होईल याची गांर्भीयाने दक्षता घेण्याचे निर्देशही उपस्थित अधिकाऱ्याऱ्यांना दिले.

वेकोलि भुमीअधिग्रहीत गावातील तसेच परिसरातील शिक्षित व व्यावसायिक शिक्षण पात्र बेरोजगार युवकांनी ओबी कंपन्यांमध्ये रोजगार मिळवण्याकरिता वेकोलिच्या सर्व क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयाकडे आवेदन करण्याच्या सुचना सुध्दा हंसराज अहीर यांनी केल्या आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular