Saturday, May 2, 2026
HomeEducationalबारावी च्या निकालात इन्फंट ज्युनियर कॉलेज राजुरा तालुक्यात अव्वल

बारावी च्या निकालात इन्फंट ज्युनियर कॉलेज राजुरा तालुक्यात अव्वल

Infant Junior College Tops Rajura Taluka in Class 12 Results

चंद्रपूर : — इयत्ता बारावी परीक्षेचा आज जाहीर झालेला निकाल इन्फंट जिजस सोसायटीद्वारा संचालित इन्फंट जिजस ज्युनियर कॉलेज, राजुरा साठी अभिमानास्पद ठरला असून विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा जपत उल्लेखनीय कामगिरी केली.

यामध्ये युवराज सु. तुम्मेवार याने ९४.१७ टक्के गुण मिळवून राजुरा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर महाविद्यालयीन स्तरावर हेमांगी सुनील पायपरे हिने ८४.५० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक आणि आरती शंकर पहानपटे हिने ८४.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

तसेच ओम किरण लांडे याने ८२.१७ टक्के गुणांसह चौथा क्रमांक, तर निशांत निलकंठ गोहणे याने ८०.३३ टक्के गुणांसह पाचवा क्रमांक प्राप्त करून विज्ञान महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

यावर्षी महाविद्यालयाचे एकूण ३२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि ९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून सर्वच विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी नोंदवली आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, सचिव तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, प्राचार्य, प्राध्यापकवृंद तसेच पालकवर्गाकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular