Subhashbhau Dhote won with a huge majority – MP Pratibha Dhanorkar
चंद्रपूर :- जिवती तालुक्यातील पाटण येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि लोकप्रिय खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे किशोर चांदुर यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना खा. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान करून मला विजयी केले त्याच प्रमाणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपले आमदार सुभाषभाऊ धोटे MLA Subhash Dhote यांना देखील प्रचंड बहुमताने विजयी करा. आम्ही आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम तत्पर राहू.
तर आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, पाटण आणि जिवती परिसराच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत असून येणाऱ्या काळात या भागात विकासाला अधिक गती देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. Congress workers meet in Patan: MP Pratibha Dhanorkar felicitated
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, अध्यक्ष आदिवासी नेते तथा माजी जि. प. सदस्य भिमराव मडावी, प्रमुख अतिथी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, माजी सभापती सुग्रीव गोतावळे, महिला अध्यक्षा नंदाताई मुसने, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कोरपणा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, कृ. उ. बा. स संचालक नामदेव जुमनाके, विठ्ठलराव थिपे, श्यामराव कोटणाके, जंगु कोटणाके, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास राठोड, शिवसेना उबाठा अध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष प्रशांत राठोड, आम आदमी पार्टी अध्यक्ष सुनील राठोड, सरपंच सिताराम मडावी, उपसरपंच गणेश शेटकर, अश्फाक शेख, ताजुद्दीन शेख, तिरुपती पोडे, पंढरी मददेवाड, निर्मला मडावी, गोपिका मडावी, निर्मला मददेवाड, सुमन शेडके, जानकु मडावी, मिरा कोवे, धृपदा आत्राम, भागिरथा सिडाम, गोविंद जाधव, दत्ता गायकवाड, बालाजी करले, विठ्ठल अक्रते, शिवाजी श्रीरामे, दयानंद घाडगे, देविदास साबणे, माधव डोईफोडे, अमोल कांबळे, सलीम शेख, गजू देवकते, बाबाराव कांबळे, रशिद शेख, गणेश शेटकर, प्रभाकर उईके, निखिल मडावी, सिताराम मेश्राम, गजानन मडावी, श्रावण मडावी, गणेश वाघमारे, गोपाल कासले यासह काँग्रेस चे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.