Inauguration ceremony of the auditorium of the Bhoi community All-round development of all societies is my aim – MP Pratibha Dhanorkar
चंद्रपूर :- मी खासदार म्हणून सर्वच समाजाच्या, जातीच्या व धर्माच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे आयोजित भोई समाजाच्या सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.
2024 च्या निवडणूकीत मला सर्वच समाजाच्या नागरीकांनी भरभरुन मत रुपी आर्शिवाद दिला. विशेषतः 2019 व 2024 च्या दोन्ही निवडणूकीत राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी दाखविलेल्या प्रेमासाठी मी आयुष्यभर ऋणी राहील. मी प्रत्येक धर्माच्या जातीच्या नागरीकांसाठी सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे, असे मत देखील यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी लखमापूर येथे आदिवासी समाजाचे दैवत असणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे देखील अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर आमदार सुभाष धोटे, राजुरा नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा लखमापूरवासीयांतर्फे सत्कार करण्यात आला.