Tuesday, June 30, 2026
HomeCrimeरामनगर पोलिसांचा हॉटेलमध्ये छापा - २२.२२ ग्रॅम एमडी सह तिघांना अटक

रामनगर पोलिसांचा हॉटेलमध्ये छापा – २२.२२ ग्रॅम एमडी सह तिघांना अटक

Ramnagar Police raid hotel – Three arrested with 22.22 grams of MD Drugs

चंद्रपूर :- मानवी मनोव्यापारावर गंभीर परिणाम करणाऱ्या मेफेड्रोन (एमडी) MD या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघांना रामनगर पोलिसांनी धाडसी कारवाई करत अटक केली. आरोपींकडून सुमारे २२.२२ ग्रॅम एमडी पावडर, आठ मोबाईल फोन आणि वजनकाटा असा एकूण १ लाख ६६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Ramnagar Police raid hotel, MD Drugs seized

बाल गुन्हेगारी कायदे अधिक कडक करा……

पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत शहरातील एका सुपर लॉजमध्ये काही इसम एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी थांबल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी लॉजमध्ये छापा टाकत आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले. उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू……..

या कारवाईत अब्दुल राजीक अब्दुल रशीद (वय ४४, अकोला), शेख मुस्तफा शेख रहीम कुरेशी (अकोला) आणि मोहम्मद नासीर रियाज शेख (धुळे) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून २२.२२ ग्रॅम एमडी पावडर (अंदाजे किंमत १.३० लाख रुपये), आठ मोबाईल फोन (सुमारे ३६ हजार रुपये) आणि एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा जप्त करण्यात आला. Ramnagar Police Station चंद्रपूरातील वीज कंत्राटदारांचा बेमुदत काम बंद चा इशारा……

या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

सदर कार्यवाही चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सपोनि शिवाजी नागवे, सपोनि हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे, पोहवा आनंद खरात, शरद कुडे, जितेंद्र आकरे, राम नैताम, बाबा नैताम, सफौ प्रकाश बल्की, पोअ पंकज पोंडे, प्रकाश मडावी, संदीप गेडाम, प्रफुल पप्पुलवार, सुरेश कोरवार, पंकज ठोंबरे. पोहवा रवीकुमार, मपोहवा मनिशा मोरे, मपोअ ब्युटी साखरे यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular