Tuesday, June 30, 2026
HomeBussinessहॉटेल व्यावसायिकांना अन्न सुरक्षा प्रशासनाचे नियमांचे धडे

हॉटेल व्यावसायिकांना अन्न सुरक्षा प्रशासनाचे नियमांचे धडे

Hotel owners receive lessons on Food Safety Administration regulations

चंद्रपूर :- जिल्ह्यातील हॉटेल/रेस्टॉरंट/बेकरी/डेअरी/कॅटरर्स/ स्विटमार्ट व इतर अन्न व्यवसायिकांची अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर कार्यालयामार्फत बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सहायक आयुक्त (अन्न) प्रवीण उमप, अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कापगते, मेघा फाळके, कुणाल मुळे व प्रणय कांबळे यांच्यासह 70 अन्न व्यवसायिक उपस्थित होते. Hotel owners receive lessons on Food Safety

उपचाराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू…….

सदर बैठकीमध्ये अन्न व सुरक्षा आयुक्त यांनी 23 जून 2026 रोजी निर्गमीत केलेल्या आदेशाच्या अनुषगांने तेलाचे पुर्नवापर, सुरक्षित पिण्याचे पाणी नाकारणे, तापमाण नियंत्रण त्रूटी, वैद्यकीय तपासणी नसलेले कर्मचारी, अन्न व्यवसायिकांना आवश्यक परवाना/नोंदणी प्रमाणपत्र, वर्तमानपत्रात अन्न देण्यास बंदी, पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र, कच्चे व शिजवलेले अन्न, शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थ यांची वेगवेगळी साठवणूक व तयार अन्नपदार्थात फुड कलरचा वापर न करणे, अशा विविध मुद्यांवर सविस्तर माहिती देण्यात आली. बाल गुन्हेगारी कायदे अधिक कडक करा……

अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 मधील विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करून आयुक्तांच्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अन्न व्यवसायिकांना सुचित करण्यात आल्याचे सहायक आयुक्त उमप यांनी कळविले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular