Friday, October 16, 2026
HomeNationalजनगणनेत OBC साठी स्वतंत्र कॉलम द्या

जनगणनेत OBC साठी स्वतंत्र कॉलम द्या

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातर्फे आज, शुक्रवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘ओबीसी हक की हुंकार’ या विशेष कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे सर्व ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेमध्ये नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२६ चे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजितभाऊ वंजारी यांच्या निवडणूक प्रचाराच्या रणनीतीचे आणि नियोजनाचे सविस्तर चर्चासत्र पार पडले. Provide a separate column for OBCs in the census

कार्यक्रमादरम्यान नागपूर विभागाचे राज्य समन्वयक मोरेश्वर भाडे यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. यावेळी जिल्हा काँग्रेस ओबीसी अध्यक्ष श्यामकांत थेरे म्हणाले की, गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त कार्यालयाद्वारे आगामी ‘जनगणना २०२७’ संदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट न करून केंद्र सरकारने ओबीसी समाजाची घोर फसवणूक केली आहे. OBC Congress

याप्रसंगी ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत थेरे म्हणाले कि, ओबीसी समाजाला शिक्षण, रोजगार आणि कल्याणकारी योजनांमध्ये त्यांचा हक्क व योग्य वाटा मिळण्यासाठी अचूक जातनिहाय आकडेवारी असणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारचे हे पाऊल OBC समाजाला त्यांच्या घटनात्मक हक्कांपासून वंचित ठेवणारे असून, सरकारची मागासवर्गीय विरोधी मानसिकता यातून उघडी पडली आहे, असा घणाघात थेरे यांनी केला. केंद्र सरकारने त्वरित या अधिसूचनेत दुरुस्ती करून ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, अन्यथा या अन्यायाविरोधात रस्त्यापर्यंत तीव्र संघर्ष उभारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या सभेमध्ये महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील दुष्काळ परिस्थितीबाबतही सविस्तर चर्चा करून त्यावर उपाययोजना आखण्याविषयी उपस्थितांनी आपली मते मांडली.

या कार्यक्रमास काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन वैद्य, जिल्हा ओबीसी काँग्रेस अध्यक्ष श्यामकांत थेरे, शहर जिल्हाध्यक्ष ओबीसी काँग्रेस तथा नगरसेवक राहुल चौधरी, ओबीसी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विनोद अहिरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल नरुले, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेविका वैशाली महाडोळे, नगरसेवक अजय बल्की, अजय महाडोळे, अतुल पिंपळकर, उदय धोबे, प्रणय धोबे, सोनू पिदूरकर, गणपत खुडे, चंदू माथने, भगवती पिदूरकर, अंकुश चौधरी, अतुल ठाकरे यांच्यासह शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते. या संपूर्ण सभेचे यशस्वी आयोजन चंद्रपूर शहर जिल्हा ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत थेरे व अध्यक्ष राहुल चौधरी यांच्या वतीने करण्यात आले. संचालन गोपाल अमृतकर आणि आभार अजय बल्की यांनी मानले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular