चंद्रपूर :- धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने जनसंपर्क कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर गांधी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून महामानवाला नमन केले. tribute to the great visionary Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Dhammachakra Anupravartan Din
यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, अनु सुचित जाती मोर्चा महानगर प्रमुख विमल कातकर, महामंत्री रविंद्र गुरुनुले, नगरसेवक सरला कुळसंगे, नगरसेविका शितल गुरुनुले, आशा देशमूख, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, प्रमोद शास्त्रकार, निलिमा वनकर, अमोल शेंडे, प्रविण गिलबीले, करणसिंग बैस, अॅड राम मेंढे, सुमीत बेले, चंद्रशेखर देशमूख, विनोद अनंतवार, यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतीय इतिहासातील सामाजिक परिवर्तन, मानवी प्रतिष्ठा आणि समतेच्या मूल्यांची आठवण करून देणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे. १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या ऐतिहासिक घटनेने देशाच्या सामाजिक आणि वैचारिक प्रवासाला नवी दिशा दिली. अन्याय, विषमता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध संघर्ष करताना बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांना आपल्या कार्याच्या केंद्रस्थानी ठेवले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वाभिमान आणि न्यायाची हमी देणारी लोकशाही व्यवस्था मजबूत केली. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या विचारांतून त्यांनी वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांना प्रगतीचा मार्ग दाखविला. सामाजिक विषमता दूर करून प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar म्हणाले.
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन करताना आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या विचारांचे स्मरण केले. बाबासाहेबांनी दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश समाजाच्या सर्व घटकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक सलोखा जपणे, प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून देणे आणि न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील राहणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना या अभिवादन कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आली.
chandrapurtoday6@gmail.com