Monday, August 31, 2026
HomeCrimeपत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न

चंद्रपूर :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर जीवघेणा हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त २ महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. Husband sentenced to 5 years of rigorous imprisonment

ही घटना ३ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता घडली. फिर्यादी महिला तिचे हॉस्पिटलचे काम आटोपून घरी परत येत असताना आरोपी पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्याने फिर्यादीला घरात जाण्यास मनाई केली. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर हाताने तसेच पायावर दोन-तीन वेळा सत्तूराने वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्यादीची तक्रार होती. Attempt to kill wife over suspicions regarding her character

फिर्यादीच्या बयानावरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८/२०२३, कलम ३०७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. त्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या खटल्याची सुनावणी मा. पी. एम. गुप्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. सुधाकर डेंगावर यांनी प्रभावी युक्तिवाद करून सादर केलेले साक्षी व पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले.

३१ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीस कलम ३०७ भादंवि अंतर्गत ५ वर्षे कठोर कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास २ महिन्यांच्या साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र प्रभाकर उपरे, पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी सरकारी अभियोक्ता अॅड. सुधाकर डेंगावर, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार प्रकाश शेंडे व ब.नं. २३७, पोलीस ब्रह्मपुरी, तसेच दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर यांनी सहकार्य केले.

सदर कामगिरी आयुष नोपाणी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, ईश्वर कातकाडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular