Rajura firing massacre Two accused arrested
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस फोफावत आहे, नुकतेच चंद्रपूर शहरातील एका व्यापारी संकुलात मनसे वाहतूक जिल्हाध्यक्ष यांचेवर गोळीबार झाला त्यानंतर बल्लारपूर शहरातील व्यवसायिकाच्या दुकानावर बॉम्ब हल्ला झाला हे प्रकरण शांत होत नाही तेच दिनांक 23 जुलै रोजी राजुरा शहरातील भर चौकात गोळीबार Gun Firing झाला यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला Murder Crime या घटनेने राजुरा शहरासह जिल्ह्यात खळबळ माजली.
दिनांक 23 जुलै रोजी राजूरा पोलीस स्टेशन हद्दीतील सोमनाथ पुरा येथील लल्ली शेरगिल याचेवर झालेल्या प्राणघातक हल्याच्या जुन्या वैमानस्यातुन लल्ली शेरगील व शगीर उर्फ मोनू कदिर शेख दोघेही रा. राजूरा यांनी 23 जुलै रोजी सायंकाळी 7 वा. चे सुमारास पंचायत समीती चौक राजूरा येथे शिवज्योत सिंह देवल याचे वर गोळीबार (Firing) करून ठार मारून फरार झाले. Chandrapur Crime
सदर घटनेचे गांभिर्य ओळखुन पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु हे तात्काळ घटनास्थळी पोहचुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, राजूरा पोलीस स्टेशन व उपविभाग राजूरा येथिल अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. Rajura Police Station
स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत अवघ्या काही तासातच आरोपी लल्ली शेरगिल व शगीर उर्फ मोनू कदीर शेख या दोन्ही आरोपींना हत्यारासह ताब्यात घेतले आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास राजूरा पोलीस स्टेशन करित आहेत.