Raid on gambling den in Chandrapur’s forest, 7 gamblers arrested
चंद्रपूर :- शहरातील अष्टभुजा वार्डातील वैध्यकीय महाविद्यालया मागील झूडपी जंगलात जुगारी अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत 7 आरोपीना ताब्यात घेत त्यांचेकडून साहित्य व नगदी असा एकूण 29,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. LCB Police Raid Gambling den
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे जिल्ह्यात अवैध व्यवसाय, जुगार, प्रोव्हीशन रेड यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्हा पोलिसांना दिले. Code of Conduct
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर LCB पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनात पथक पेट्रोलिंगवर असताना अष्टभुजा वार्ड येथील मेडिकल कॉलेज मागील परिसरातील झूडपी जंगलात जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली याद्वारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि विनोद भुरले, मधुकर सामलवार व पथक यांनी जुगार अड्डयावर धाड टाकली यात 7 जुगारी खेळताना आढळले दरम्यान त्यांना ताब्यात घेत त्यांचे जवळील जुगार साहित्य व नगदी रक्कम असा 29,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
7 आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोहवा किशोर वैरागडे, रजनिकांत पुठ्ठावार, सतिश अवथरे, संतोष येलपुरलवार, गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे, मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.