posters, 3259 banners and 1217 hoardings removed in Chandrapur district
चंद्रपूर :- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. व मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहितेचे नोडल अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्ज व इतर बाबी काढून घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील एकूण 3841 पोस्टर्स, 3259 बॅनर्स आणि 1217 होर्डींग्ज प्रशासनाने हटविले आहेत. posters, banners and hoardings removed in Chandrapur district
निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच सरकारी मालमत्तेवरून 24 तासाच्या आत, सार्वजनिक ठिकाणांवरून 48 तासांच्या आत तर खाजगी मालमत्तेवरून 72 तासांच्या आत सर्व शासकीय कार्यालयातील, परिसरातील तसेच खाजगी जागेतील सर्व राजकीय पक्षाचे, नेत्यांचे, सदस्यांचे फोटो, बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग्ज, कटआऊट, झेंडे, भित्तीपत्रके, प्रसिध्दी पत्रके, प्रचार पत्रके काढण्यात येतात. Chandrapur District administration takes action within 24, 48 and 72 hours
याअंतर्गत जिल्हा प्रशासनाने सरकारी मालमत्तेवरून 24 तासांच्या आत 853 भिंतीपत्रके, 1940 पोस्टर्स, 777 कटआऊट / होर्डींग्ज, 2016 बॅनर्स, 732 झेंडे व 119 इतर बाबी काढल्या.
सार्वजनिक ठिकाणांवरून 48 तासांच्या आत 803 भिंतीपत्रके, 1053 पोस्टर्स, 259 कटआऊट / होर्डींग्ज, 759 बॅनर्स, 862 झेंडे व 612 इतर बाबी तसेच खाजगी मालमत्तेवरून 72 तासांच्या आत 507 भिंतीपत्रके, 848 पोस्टर्स, 181 कटआऊट/ होर्डींग्ज, 484 बॅनर्स, 304 झेंडे व 983 इतर बाबी काढल्या आहेत. याबाबतचा परिपूर्ण अहवाल जिल्हा प्रशासनाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. Instructions from the District Election Officer, Nodal Officer of the Model Code of Conduct
मतदारसंघनिहाय करण्यात आलेली कारवाई : 70 – राजूरा विधानसभा मतदार संघात 24 तासात भिंतीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट / होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे, इतर अशा एकूण 1403 बाबी, 48 तासात 1278 बाबी आणि 72 तासात 301 बाबी काढण्यात आल्या.
71 – चंद्रपूर विधानसभा मतदार संघात 24 तासात भिंतीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट / होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे, इतर अशा एकूण 716 बाबी, 48 तासात 801 बाबी आणि 72 तासात 1574 बाबी काढण्यात आल्या.
72 – बल्लारपूर विधानसभा मतदार संघात 24 तासात भिंतीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट / होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे, इतर अशा एकूण 1498 बाबी, 48 तासात 1095 बाबी आणि 72 तासात 675 बाबी काढण्यात आल्या.
73 – ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात 24 तासात भिंतीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट / होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे, इतर अशा एकूण 541 बाबी, 48 तासात 522 बाबी आणि 72 तासात 375 बाबी काढण्यात आल्या.
74 – चिमूर विधानसभा मतदार संघात 24 तासात भिंतीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट / होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे, इतर अशा एकूण 1475 बाबी, 48 तासात 352 बाबी आणि 72 तासात 137 बाबी काढण्यात आल्या.
75 – वरोरा विधानसभा मतदार संघात 24 तासात भिंतीपत्रके, पोस्टर्स, कटआऊट / होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे, इतर अशा एकूण 804 बाबी, 48 तासात 300 बाबी आणि 72 तासात 243 बाबी काढण्यात आल्या आहेत.