Tuesday, March 25, 2025
HomeMaharashtraमहाकाली कॉलरी परिसरात पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करा

महाकाली कॉलरी परिसरात पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करा

Provide permanent water supply to the people of Mahakali colliery area          Bahujan Samaj Party’s demand to Municipal Commissioner

चंद्रपूर :- महाकाली कॉलरी परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी या मागणीचे निवेदन बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिरीष गोगुलवार यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त यांना सादर करण्यात आले. Provide permanent water supply to Mahakali colliery area

शहरातील महाकाली कॉलरी या परिसरातील लोकांना पाण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून इथल्या कोळसा खाणीमध्ये पाणी शिरल्यामुळे वार्डाला पाणीपुरवठा करणारी प्रमुख पाईपलाईन पाण्याखाली बुडाली. त्याच पाईप लाईनमुळे परिसरातील लोकांसाठी पाण्याचा पुरवठा होत होता. परंतु प्रमुख पाईपलाईन पाण्याखाली गेल्यामुळे परिसरातील लोकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे.

अमृत जल योजनेअंतर्गत इथल्या लोकांना नळाचे कनेक्शन देण्यात आले परंतु अद्यापही नळ सुरु करण्यात आले नाही. MNC चंद्रपूर महानगरपालिके मार्फत पाण्याच्या टँकरद्वारे व्यवस्था होत असली तरी वार्डातील लोकसंख्या पाहता व गरज पाहता ती अपुरी आहे. तरी महाकाली कॉलरी परिसरातील लोकांची पाण्यासाठी होणारे हाल व त्यांच्या समस्येकडे लक्ष देत परिसरातील लोकांना पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी काही ठिकाणी पाण्याचे टंकी बसवून त्या टंकीमध्ये टँकरच्या माध्यमातून नियमित पाण्याची व्यवस्था करणे व इतर ठिकाणी दोन ट्युबवेल किंवा बोरवेल च्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करणे किंवा अमृत जल योजनेअंतर्गत दिलेल्या नळाचे कनेक्शन्स लवकरात लवकर सुरू करून महाकाली कॉलरी परिसरातील लोकांची पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून द्यावी या आशयाचे निवेदन CMC चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना बहुजन समाज पक्षाच्या वतीने देण्यात आले. BSP demand to Chandrapur Municipal Commissioner

सकारात्मक चर्चेनंतर लवकरच महाकाली कॉलनी परिसरातील लोकांसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले.

यावेळी BSP बहुजन समाज पक्षाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व महाकाली कॉलरी येथील वार्ड वासिय मोठया संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular