2nd National Jaibhim Literary Conference from today in Chandrapur Jalsa, Jaibheem rebel songs and other programs were also participated in the conference
चंद्रपूर :- लोकजागृती संस्था तथा जयभीम संम्मेलन समिति चंद्रपूर द्वारा आयोजित दूसरे राष्ट्रीय जयभीम साहीत्य संम्मेलन National Jaibhim Literary Conference शनिवार 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर ला सायंकाळी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक नाट्य सभागृह येथे आयोजित केला आहे. Chandrapur today
जयभीम संम्मेलनात कवी संम्मेलन, एकपात्री नाटक, जयभीम आंबेडकरवादी जलसा, जयभीम विद्रोही गीते, जयभीम परिसंवाद, भीम गर्जना, बुध्द – भीम गीतांचा महाजलसा कार्यक्रमांचा सहभाग असल्याची माहीती माहिती समिति चे डॉ. ईसादास भडके व अनिरूध्द वनकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. 2nd National Jaibhim Literary Conference from today in Chandrapur
31 आगस्ट ला सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाच्या उद्घाटन समारोहाला संम्मेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, उद्घाटक विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, विशेष मार्गदर्शक राजेंद्रपाल गौतम, खासदार प्रतिभा धानोरकर, अमरावती खासदार बळवंत वानखेडे, गडचिरोली खासदार नामदेव किरसान, राजुरा आमदार सुभाष धोटे, उद्योजक गुणवंत देवपारे, निवृत्त आईएएस ई. झेड. खोब्रागडे, महेंद्र ब्राम्हणवाडे, डॉ. ईसादास भडके उपस्थित राहणार आहेत.
रात्रौ 8 वाजता खेमराज भोयर, नरेंद्र सोनारकर, जसबीर चावला, मिर्झा पठारे, सिमा भसारकर, प्रब्रम्हानंद मडावी यांचे जयभीम कवी संम्मेलन होणार तर रात्री 8.30 वाजता ‘भाकर’ हे एकपात्री नाटक, रात्री 8.45 ला मुंबई च्या सुषमा देवी, रविराज भद्रे, धम्मजीत तिगोटे यांचे ‘जयभीम आंबेडकरवादी जलसा’ कार्यक्रम आयेाजित केला आहे.
1 सप्टेंबर ला सायंकाळी 6 वाजता राहुल सुर्यवंशी, निशा धोंगळे, अश्विनी खोब्रागडे, उपेंद्र वनकर, विजय पारखी, डा. रवीराज विद्रोही, मास्टर सोमकुवर यांचे ‘जयभीम विद्रोही गीते’, 6.30 वाजता ‘भारतीय लोकशाही जपण्यासाठी निवडणुक आयोग, मिडीया व मतदारांची भूमिका’ यावर परिसंवाद आयोजित केला आहे. रात्री 7.15 वाजता ‘व्हय मी सावित्री बोलतेय’ एकपात्री नाटक आयेाजित केले आहे.
रात्री 7.30 वाजता ‘जयभीम रत्न पुरस्कार’ व समारोपीय समारोह च्या संम्मेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, विरोध पक्षनेता विजय वडेट्टीवार, आमदार नितीन राऊत, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार अभीजीत वंजारी, सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, मनोहर चंद्रीकापुरे, गोंडवाना विद्यापीठ कुलसचिव डा. अनिल हिरेखन, बापु गजभारे, डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबीरे, सीडीसीसी अध्यक्ष संतोष रावत उपस्थित राहणार आहेत.
रात्री 9 वाजता भीम गर्जना व रात्री 9.15 वाजता बुध्द – भीम गीतांचा महाजलसा कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉ. इसादास भडके व अनिरूध्द वनकर यांनी दिली.