Monday, May 25, 2026
HomeIndustrialऊर्जा क्षेत्रात ‘पॉवर कप’चा जल्लोष

ऊर्जा क्षेत्रात ‘पॉवर कप’चा जल्लोष

Power Cup Cricket Tournament 2026, organized by Dhariwal Infrastructure Limited, has concluded

चंद्रपूर :- ऊर्जा क्षेत्रातील उद्योग व संस्थांमध्ये परस्पर सहकार्याची भावना दृढ व्हावी या उद्देशाने धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्या वतीने आयोजित “पॉवर कप क्रिकेट स्पर्धा – २०२६” उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत महाजेनको, महाट्रान्सको, पॉवरग्रिड तसेच यजमान धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या नामांकित संस्थांनी सहभाग घेतला. Power Cup Cricket Tournament 2026

ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. दैनंदिन कामाच्या तणावातून बाहेर पडून खेळाडूंनी आपल्या सुप्त गुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेला रंगत आणली.
स्पर्धेचा अंतिम सामना २८ मार्च रोजी महाजेनको आणि धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्यात पार पडला. अत्यंत चुरशीच्या लढतीत धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड संघाने सरस खेळ करत विजेतेपद पटकावले, तर महाजेनको संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. Dhariwal Infrastructure Limited

यावेळी धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे प्लांट हेड देवेश कुमार यांनी, “उद्योगातील कर्मचाऱ्यांमध्ये असलेले क्रीडा गुण उजागर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असून, सहकार्याची भावना वाढीस लागते,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास महाव्यवस्थापक पुंडलिक वनवे, अतुल गोयल, कौशिक भट्टाचार्य, उपमहाव्यवस्थापक दिनेश गाखर, मुख्य व्यवस्थापक डॉ. अनिष नायर तसेच कंपनीचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी संघ व खेळाडूंचे अभिनंदन करताना, आयोजनात योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार महाव्यवस्थापक पुंडलिक वनवे यांनी मानले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular