Midnight police raid at Shiv Sena office bearer’s house in Chandrapur
Accused arrested with live cartridge, sword
चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी Crime लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस व गुन्हे शोध पथकाने शिवसेना (उबाठा) पदाधिकारी यांच्या घरी रात्रौ 11-30 च्या दरम्यान धाड टाकली यात पोलिसांना 40 जिवंत काडतूस, तलवार, धातूची वाघ नख व बेस बॉल बॅट आढळून आली live cartridge, sword यावरून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तीत खळबळ उडाली आहे. Chandrapur Todays Crime
शिवसेना (उबाठा) जिल्हा पदाधिकारी विक्रांत सहारे यांचे घरी शस्त्र असल्याची गोपनीय माहिती चंद्रपूर जिल्हा पोलीस यांना प्राप्त झाली त्यानुसार रामनगर पोलीस यांनी सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेसह मध्यरात्री साडेअकरा वाजता धाड टाकली असता खळबळजनक वस्तू आढळून आल्या यात 40 जिवंत काडतूस, तलवार, धातूची वाघ नख व बेस बॉल बॅट आदी जप्त करीत आरोपीला अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक मुंमक्का सुदर्शन यांचीही उपस्थिती होती. Midnight police raid at Shiv Sena office bearer’s house in Chandrapur
चंद्रपुरात वाढती गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुंमक्का सुदर्शन यांनी विशेष मोहीम राबवली असून जिल्ह्यात विविध ठिकानाहून शस्त्र जप्त करण्यात येत आहे, 6 सर्राईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.