Monday, November 4, 2024
HomeAccidentप्रथम वर्ष प्रवेशाकरिता मुदत वाढ द्या
spot_img
spot_img

प्रथम वर्ष प्रवेशाकरिता मुदत वाढ द्या

Grant extension for first year admission : Gondwana University Young Teachers demand

चंद्रपूर :- गोंडवाना विद्यापीठाने 8 जुलै 2024 च्या परिपत्रकाद्वारे संलग्नित महाविद्यालयांना ऑनलाईन प्रणाली द्वारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रथम सेमिस्टर करिता प्रवेश देण्याची प्रक्रिया व मुदत 7 ऑगस्ट 2024 पर्यंत दिलेली होती, मात्र ग्रामीण व आदिवासी भागात अतिवृष्टी, पूरस्थिती व शेतीची कामे या विविध कारणामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाला अजून पावतो प्रवेश घेतलेला नाही. तसेच दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे इंटरनेटची गती हळू असल्याने महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेशासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. Grant extension for first year admission

या संदर्भात अनेक महाविद्यालयाकडून प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी संघटनेकडे होत आहे. या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेने प्रथम वर्ष प्रवेशासाठी त्वरित मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोरलावार व पदाधिकाऱ्यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे केलेली आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांची व महाविद्यालयांची अडचण विद्यापीठ प्रशासनाला शिष्टमंडळाने समजून सांगितली. Gondwana University Young Teachers demand

यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असे प्र- कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular