Monday, September 28, 2026
HomeGrampanchayat1 ऑक्टोबर रोजी जिल्हाभर एक तास सामुहिक श्रमदान

1 ऑक्टोबर रोजी जिल्हाभर एक तास सामुहिक श्रमदान

चंद्रपूर :- ‘‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमाचे आयोजन 1 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्ह्यात व्यापक स्वरूपात करण्यात येणार आहे. श्रमदानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करणे आणि स्वच्छ, सुंदर व निरोगी गावांच्या निर्मितीसाठी लोकसहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.One hour of ‘collective voluntary labor’ across Chandrapur district

या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर, रस्ते, चौक, जलस्रोत परिसर तसेच इतर आवश्यक ठिकाणी सामूहिक श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासोबतच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, परिसर स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता ती प्रत्येक गावाची आणि प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी झाली पाहिजे. 1 ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने किमान एक तास स्वच्छतेसाठी दिल्यास सामूहिक सहभागातून स्वच्छ आणि निरोगी गावांची निर्मिती अधिक प्रभावीपणे करता येईल. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचवावा तसेच या उपक्रमात अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गट, युवक, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular