Omat Waste Limited conducts health check-up camp for employees and workers
चंद्रपूर :- सुदृढ व निकोप समाज निर्मिती हे उद्दिष्ट ठेवून सर्व कर्मचारी व कामगारांची आरोग्य तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन ओमॅट वेस्ट लिमिटेड (श्री सिद्धीबली इस्पात लिमिटेड) च्या वतीने करण्यात आले. या शिबिराला सर्व कर्मचारी व कामगार यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अशी माहिती महाप्रबंधक रवी चावरे यांनी पत्रकाद्वारे दिली.
प्लांट हेड अविनाश डोंगरे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या शिबिरात एकूण ६५० कर्मचारी व कामगार यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. Omat Waste Limited conducts health check-up camp for employees and workers

ओमॅट वेस्ट लिमिटेड प्लांटमधील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य आणि कल्याण ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. या वचनबद्धतेनुसार आणि कारखाने कायदा, १९४८ आणि महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ यांचे पूर्ण पालन करून, आम्ही आमच्या सुविधेत आमची वार्षिक आरोग्य तपासणी आयोजित करीत असल्याचे अविनाश डोंगरे यांनी यावेळी सांगितले.
कामगार मंत्रालयाच्या फॅक्टरी मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून अधिकृत असलेल्या डॉ. वर्षा पोतदार यांच्या नेतृत्वात प्रतीक्षा अदे, रंजना तारकुंडे, आचल निंबोळकर, भूमिका सौदागर, अतुल गुडदे, सोनू मारसिंगे, लिलाधर गोधनें या वैद्यकीय पथकाने या आरोग्य तपासणी शिबिराची धुरा सांभाळली.
या आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वीततेकरिता ओमॅट वेस्ट लिमिटेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषभ मित्तल, महाप्रबंधक अमरेंद्र सिंह ठाकूर, महाप्रबंधक मनीष वडस्कर, महाप्रबंधक सतीश मूलकलवार, महाप्रबंधक ओम नरेश भदोरिया, मानव संसाधन विभाग प्रमुख अभय सिंह, प्रशासन विभाग प्रमुख दिपक पराळे, चेतन चोहिवाल, कपिल जैन, आनंद मिश्रा, अभिषेक खुपत, सचिन भांडेकर, शुभम तंबोली, स्वप्नील देशमुख, खुशाल गावंडे यांनी विशेष योगदान दिले.