The entire Hindu society united Nyayatra in Chandrapur in support of Bangladesh Hindus
चंद्रपूर :- बांगलादेशातील हिंदू, सिख, बौध्द, जैन, ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समाजावर इस्लामिक अतिरेक्यांनी मागील अनेक महिन्यापासून अत्याचार सुरु केले. ज्यात हल्ले, हत्या, लुटमार, जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ, हिंदू आणि अल्पसंख्यांकांच्या धर्मिक स्थळांची विटंबना सुरु केली आहे. या घटना रोखण्यासाठी योग्य ती पावेल उचलण्या ऐवजी सद्याचे बांगलादेश सरकार व इतर संबधित यंत्रणा मूक प्रेक्षक बनून राहिल्या आहेत. त्यांचा आवाज दाबण्यासाठी लोकशाही पद्धतीने आवाज उठवण्याचा अवलंब केला तेव्हा अन्याय आणि अत्याचाराचा एक नवीन टप्पा दिसून येतो आहे. हिंदुच्या अशा शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉनचे संन्यासी पूज्य श्री चिन्मय कृष्ण दास जी यांना बांगलादेश सरकारने अटक करणे अन्यायकारक आहे.
या गंभीर प्रसंगी भारत सरकार व आंतरराष्ट्रीय संस्थांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून ते एकटे नसून संपूर्ण जग त्यांच्या पाठीशी आहे हा भाव व्यक्त करण्याकरीता चंद्रपुरात मंगळवारी 10 डिसेंबरला दुपारी 2.30 वाजता भव्य न्याय यात्रा काढण्यात आली. The entire Hindu society united
या न्याय यात्रेत चंद्रपूर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने नागरीक महिला वर्ग उपस्थित होते. विविध समाजतील समाज बांधव, अल्पसंख्याक समाजातील धर्मगुरू, जेष्ठनागरिक , महिला वर्ग व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आ.किशोर जोरगेवार या न्याय यात्रेत सहभागी झाले होते.
न्याय यात्रा गांधी चौक येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता झाली. निवासी जिल्हाधिकारी यांना सकल हिंदू समाज, चंद्रपूर तर्फे निवेदन देण्यात देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक दीपक जी तामशेट्टीवार, जिल्हा संघचालक तुषार जी देवपूजारी, तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार, नगर संघचालक रवींद्रजी भागवत, शीख समाजाचे चमकौर सिंग, बौद्ध समाजाचे धम्म्म भन्ते जी, इस्कॉन चे रमेश जी बिराजदार, स्नेहाताई मिसार, प्राजक्ता भालेकर, अशोक जीवतोडे, शैलेश बागला, शवारकरी चे मेश्राम हे उपस्थित होते.
सकल हिंदू समाजाच्या प्रमुख मागण्या
बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराविरुद्ध तेथील सरकारला भारत सरकारकडून कठोर इशारा दिला जावा, मानवाधिकारवादी संघटनांनी हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकावरील हल्ल्याची, अत्याचाराची दखल घेऊन हा मुद्दा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लावून धरावा, बांगलादेशातील हिंदूंच्या जीविताचे आणि संपत्तीचे रक्षण तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घातला जावा, इस्कॉनचे साधू चिन्मय कृष्णदास यांची तुरुंगातून तत्काळ स-सन्मान मुक्तता करण्यात यावी, हिंदू कलाकार, व्यावसायिक, उद्योगपती, खेळाडू, राजकीय नेते तसेच हिंदू मंदिरांना सुरक्षा पुरविली जावी, बांगलादेशातील पाकिस्तानी जिहाद्यांच्या हस्तक्षेपाला पायबंद घालावा, संयुक्त राष्ट्रसंघात हिंदू, बौद्ध, खिश्चन व अन्य अल्पसंख्यकांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला जावा, बांगलादेशातील अल्पसंख्य समाजाच्या रक्षणाची मागणी करणाऱ्या देशोदेशीच्या विविध आंदोलनांना सुरक्षा प्रदान केली जावी, इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.



