इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण.
चंद्रपूर :- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुराच्या इयत्ता ८ व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र तसेच इयत्ता ९ वी आणि १० वीतील विद्यार्थ्यांनी सास्ती ओपन कास्ट माइनला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घेत व्यवहारीक शिक्षणाची ज्ञानात भर घातली. Infant Convents students’ visit to bank and coal mine
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र चे राजुरा शाखा व्यवस्थापक रमेश काळे, व्यवस्थापक अक्षय चौधरी, सहाय्यक व्यवस्थापक प्रज्ञा आलोने, रोखपाल आकाश बानकर यांनी बँकेच्या कार्यप्रणाली (Saving account, fixed deposit, current account, housing loan, how to fill form, gold loan etc.) बाबत मुलाना सविस्तर माहिती दिली. तर सास्ती ओपन कास्ट माइन्स येथे तिरुपति सातुर, रवि राजूरकर (पोल लाइन ऑपरेटर) यांनी नववी आणि दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना खदानीचे क्षेत्रफळ, कोळसा काढण्यासाठी केलेले विस्फोट, कोळसा नेण्यासाठी केले जाणारे परिवहन, खदानितून निघालेल्या पाण्याचे शुद्धीकरण या विषयावर सविस्तर माहिती दिली. अशाप्रकारे या प्रात्यक्षिक उपक्रमांतर्गत आठव्या, नव्या आणि दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली.Practical learning from field visits
यावेळी इन्फंट काँन्व्हेंट चे शिक्षक सोनाली कलुरवार, श्वेता भटारकर, रामकली शुक्ला, शोएब शेख, चांगदेव पोतराजे यासह विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.