Mahesh Mende’s helping hand to the disabled Hanuman Sengerap
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भिवापूर वॉर्ड, शिवाजी नगर परीसरातील पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली होती यातच दिव्यांग हनुमान सेंगेरप ला अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, काँग्रेसचे नेते महेश मेंढेनी मदतीचा हाथ दिला असून हनुमानाला मोठा सहारा मिळाला आहे.
अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्या माध्यमातून चंद्रपुरात गोर गरीब आणि सामान्यांना मदतीचा हात हा हाक मारण्याअगोदर पोहचत आहे. मग मदत मागणारा असो व गरजू त्यांना मदत करण्याचे काम हातही घेतले आहे. Mahesh Mende’s helping hand to the disabled Hanuman Sengerap
नुकतेच मुसळधार पावसाने मागील दहा दिवसापासून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुठे पुराने वेढले तर कुठे पावसाच्या मुसळधार सरींमुळे छत गेले. तर काहींचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अश्याना महेश मेंढे कडून मदत देणे सुरु असून सर्वाना एकप्रकारे मदतीचा हात दिला आहे. पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली आहेत. ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे, वादळामुळे छप्पर उखडले आहे अशाना तात्काळ मदतीसाठी ताडपत्री उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच काही गरजूना आर्थिक मदत देण्यात आली.
अश्यातच शिवाजी नगर येथील दिव्यांग हनुमान नरसंहरू सेंगेरपला पावसामुळे परिस्थिती हलाकीची झाली असून त्याचे छत गेले असतांना मदतीची हाथ म्हणून महेश मेंढे यांनी मदत केली आहे. त्यामुळे परिसरात महेश मेंढेच्या मदतीची चर्चा सर्वाकडे होत आहे.
महेश चा हात हा लवकर गरजू पर्यंत पोहचत असल्याने त्यांना सहारा मिळत आहे.