Friday, April 17, 2026
HomeMaharashtraखासदार प्रतिभा धानोरकरांचा जनता दरबार आणि जिवतीकरांचे प्रश्न मार्गी

खासदार प्रतिभा धानोरकरांचा जनता दरबार आणि जिवतीकरांचे प्रश्न मार्गी

MP Pratibha Dhanorkar’s efforts succeed

चंद्रपूर -: गडचांदूरवरून पहाडावर जाण्यासाठी नगराळा मार्गे राजुरा -गडचांदूर-येल्लापूर ही एसटी बस गेल्या सव्वा महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना गडचांदूर येथे रस्त्यावर रात्र काढावी लागत होती. या गंभीर समस्येची दखल घेत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तातडीने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, चंद्रपूर यांच्याकडे पाठपुरावा केला. MP Pratibha Dhanorkar’s efforts succeed

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पत्र क्र. 1794/2025 द्वारे निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी गडचांदूर – नगराळा -येल्लापूर – जिवती ही महत्त्वपूर्ण बस सेवा तसेच गडचांदूर येथून जिवती मार्गे धावणाऱ्या सर्व बंद बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच या बससेवेमुळे परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे जिवती येथे झालेल्या आढावा बैठकीत नागरिकांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना सांगितले होते. Gadchandur – Nagarala – Yellapur bus service resumes

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागणीची तातडीने दखल घेत राजुरा आगार प्रमुख राकेश बोधे यांनी त्वरित कार्यवाही करत बंद असलेली गडचांदूर-नगराळा-येल्लापूर बस सेवा आजपासून पूर्ववत सुरू केली आहे. यामुळे आता या मार्गावरील शेकडो प्रवाशांना पूर्वीप्रमाणे एसटी बसचा मोठा आधार मिळाला आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular