Saturday, January 18, 2025
HomeMPकेद्र सरकारच्या ओबीसी कल्याण समितीच्या सदस्य पदी खासदार प्रतिभा धानोरकर यांची निवड.

केद्र सरकारच्या ओबीसी कल्याण समितीच्या सदस्य पदी खासदार प्रतिभा धानोरकर यांची निवड.

Election of MP Pratibha Dhanorkar as Member of Central Government’s OBC Welfare Committee

चंद्रपूर :- केंद्र सरकार तर्फे नागरिकांच्या कल्याण व विकासाकरीता विविध समित्यांचे आयोजन केले जात असते. यामध्ये समितीत विविध पक्षांच्या खासदारांचा समावेश असतो. यापैकी केंद्र सरकारच्या इतर मागासवर्ग कल्याण समितीच्या सदस्य पदी खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांची निवड करण्यात आली आहे. Central Government’s OBC Welfare Committee

केंद्र सरकार तर्फे नागरिकांसाठी विविध योजना व नागरीकांचे कल्याण करण्यासंदर्भात विविध समित्यांची स्थापना नविन लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर करण्यात येत असते.

सन 2024-25 करीता केंद्र सरकारच्या इतर मागासवर्ग कल्याण समितीच्या सदस्यांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यात चंद्रपूर -वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. Election of MP Pratibha Dhanorkar as Member of Central Government’s OBC Welfare Committee

20 सदस्यीय या समितीत खासदार प्रतिभा धानोरकर यांची निवड झाल्याने केंद्र सरकार मधील इतर मागासवर्ग विभागात नागरीकांसाठी कार्य करण्याची संधी खासदार प्रतिभा धानोरकर यांना मिळाली आहे.

इतर मागासवर्ग नागरीकांच्या समस्या सोडविण्याकरीता मी प्रयत्न करणार असल्याचे या निवडीसंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular