Chandrapur city police take major action – motorcycle theft case exposed
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर पोलिसांनी दुचाकी वाहन चोरी करून ग्राइंडर मशीनने कापून तुकडे करून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे, यात 2 दोघे मोटर सायकल चोरटे, 1 वाहने कटिंग करणारा व एक खरेदी करणारा अशा 4 आरोपींना अटक करीत एकूण 57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. motorcycle theft case exposed
पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे फिर्यादी महेश गौतम काळे, रा. भिवापुर वार्ड, चंद्रपूर) यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एम.एच. 34 यु 5214) ही दिनांक 20 ऑगस्ट रोजी घरासमोरून चोरीस गेल्याची तक्रार चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. Chandrapur City Police’s action
चंद्रपूर शहर पोलिसांनी तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सुमीत शांताराम अमराजवार (वय 28, रा. भिवापुर वार्ड, चंद्रपूर), तनवीर कदिर वेग (वय 25 रा. भिवापुर वार्ड, चंद्रपूर), सत्तार शम्मी खान (वय 32, रा. पडोली, ता.जि. चंद्रपूर) याने चोरी केलेली मोटारसायकल ग्रॅन्डर कटर मशिन ने तुकडे करून काही स्वतःजवळ ठेवले व काही तुकडे विक्रीसाठी आरोपी जाकीर शेखकडे दिले. आणि जाकीर कासम शेख (वय 31, रा. भिवापुर वार्ड, चंद्रपूर) या चौघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलचे तुकडे, जुनी डिलक्स कंपनीची मोटारसायकलचे तुकडे, लोखंड कापण्याची ग्रॅन्डर कटर मशिन असा एकूण 57,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur Crime
आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम 303(2), 317(2), 324(4), 3(15) बी.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि. राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, पोउपनि. विलास निकोडे यांच्यासह डी.बी. पथकातील पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संजय धोटे, लक्ष्मण रामटेके, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपुरचंद खरवार, रूपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, सारिका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केली.
सदर गुन्ह्याचा तपास पो.अं. कपुरचंद खरवार यांच्याकडे सुरू आहे.