Saturday, January 18, 2025
HomeCrimeमहिला रक्षणासाठी जागृती मशाल मंच चे 31रोजी मध्यरात्री 'मशाल मार्च'

महिला रक्षणासाठी जागृती मशाल मंच चे 31रोजी मध्यरात्री ‘मशाल मार्च’

Midnight ‘Torch March’ of Jagruti Mashal Manch for Women Protection

चंद्रपूर :- जागृती मशाल मंच, चंद्रपूरच्या Jagruti Mashal Manch वतीने दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9 वाजता गांधी चौकातून ‘मशाल मार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘मशाल मार्च’ ला सर्व पक्षीय सर्व धर्मिय संघटनांचा सहभाग आहे.

या आयोजीत मशाल रॅलीस प्रमुख उपस्थिती वने सांस्कृतिक कार्य, मत्स व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार किशोरभाऊ जोरगेवार, विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार, जेष्ठ नेते नरेशबाबू पूगलिया, आमदार सुधाकर अडबाले, प्रशासना तर्फे, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व महानगर पालिका आयुक्त हे जनप्रतीनिधी म्हणून विशेष उपस्थित राहणार असल्याची माहिती जागृती मशाल मंच च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत तबस्सूम शेख यांनी दिली. Midnight ‘Torch March’

देशात होणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशावेळेस तमाम स्त्रीवर्गाला आपण सुरक्षित असल्याची भावना जागृत करण्यासाठी, चंद्रपूर सुरक्षित करण्यासाठी, संपूर्ण चंद्रपूरकरांनी एकत्र येवून आपले चंद्रपूर सुरक्षित करण्याची शपथ या कार्यक्रमात घेण्यात येणार आहे. Womens Protection
प्रत्येक संवेदनशील चंद्रपूरकर एकमेकांच्या सोबतीने उभा असेल तर आमच्या महिलांना कोणाचीही भिती वाटणार नाही हा विश्वास जागृत करण्यासाठी आणि महिलांना वाटणाऱ्या अंधाराची भिती घालविण्यासाठी या ‘मध्यरात्रीच्या मार्च’ चे आयोजन जागृती मशाल मंच द्वारे केल्या जात आहे.

गांधी चौक येथील गांधींजीच्या पुतळयाला माल्यार्पण करुन मशाल रॅली रात्री 9 वाजता गांधी चौक येथून निघेल, त्यापूर्वी स्त्री शक्ती दर्शविणारे सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात येणार, तसेच मान्यवर नेतागण यांचे हस्ते ‘मशाल प्रज्वलन’, (प्रियांबल) भारतीय राज्यघटना उद्देशिकेचे वाचन होईल व मशाल रॅलीचे प्रस्थान होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन रॅली पुढे प्रस्तान करेल.
रॅलीचे समापण प्रियदर्शनी चौक येथे होईल. समापणापूर्वी ‘सुरक्षा शपथ’ संपूर्ण जनता घेईल. व राष्ट्रगीताने रॅलीचे समापण होईल अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत जागृती महिला मंच च्या वतीने देण्यात आली.

चंद्रपूर शहरातील सुजान नागरिकांनी या ‘मध्यरात्री मशाल मार्च’ ला मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी जागृती मशाल मंच च्या वतीने करण्यात आले.

पत्रपरिषदेत पारोमिता गोस्वामी, प्रीतीशा साधना, अश्विनी खोब्रागडे, जयश्री कापसे गावंडे आदी जागृती मशाल मंच च्या महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular