Thursday, April 16, 2026
HomeChief Ministerगुणवंत राजनेत्याच्या वाढदिवसी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा दुग्धशर्करा योग

गुणवंत राजनेत्याच्या वाढदिवसी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा दुग्धशर्करा योग

Meritorious students honored on the birthday of a distinguished politician

चंद्रपूर :- भारतीय संस्कृती उदात्त असून संस्कार, विचार आणि असामान्य कर्तृत्व असल्याने देशाच्या सुपुत्रांनी आपले नाव देशातच नव्हे तर, जागतिक स्तरावर सुवर्णाक्षरात कोरले आहे. आजचा हा गुणगौरव सोहळा गुणवंत राजनेत्याच्या वाढदिवसानिमित्त होत आहे याचा विशेष आनंद असून हा दुग्धशर्करा योग आहे. हा देश गुणवंतांची खाण आहे, अशा गुणवंतांचा सन्मान करणे हीच आपली खरी संस्कृती आहे. गत दोन दशकांपासून गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गुणगौरव करून त्यांना भविष्यातील यशस्वी वाटचालीकरिता प्रोत्साहन व शुभेच्छा देणे हीच या कार्यक्रमामागील मुळ भावना असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी केले. Meritorious students honored on the birthday of CM Devendra Fadanvis

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanvis’s Birthday यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा व कमल स्पोर्टींग क्लब, चंद्रपूर यांचे द्वारा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते रघुवीर अहीर यांच्या विशेष पुढाकारातून दि. २२ जुलै २०२५ रोजी, चंद्रपूर शहरातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कन्यका परमेश्वरी सभागृह, कस्तुरबा मार्ग, चंद्रपूर येथे पार पडला त्याप्रसंगी हंसराज अहीर बोलत होते.

या गुणगौरव सोहळ्यास गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, हरीश्चंद्रजी अहीर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, डॉ. एम जे खान, एमआयडीसी असो. चे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, शामल अहीर, कार्यकमाचे आयोजक रघुवीर अहीर, भाजपाचे माजी जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, माजी नगरसेवक संजय कंचर्लावार, राजु अडपेवार, रामकिशोर सारडा, राहुल सराफ, विनोद शेरकी, राजु घरोटे, राजेंद्र खांडेकर, शिला चव्हाण, माया उईके, गुडधेताई, आशिष माशिरकर, प्रा रवि जोगी, प्रदीप किरमे, सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, ॲड. सारीका संदूरकर, शाम कनकम आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविकात रघुवीर अहीर यांनी कार्यक्रमामागील भुमिका विषद करताना विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती, परंपरा व चिरंतन मुल्ये विद्यार्थी दशेतच जपली पाहीजे, तिला महत्व देतांना बारा बलुतेदारीतील पारंपारीक व्यवसाय अबाधित राहावेत यासाठी आधुनिक पध्दतीने या व्यवसायाला जागतिक स्तरावर पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त करावे असे आवाहन केले. पंतप्रधान मोदीजी स्किल इंडियाच्या माध्यमातून देशाच्या पारंपारीक व्यवसायास बळ देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी डॉ. अशोक जिवतोडे यांनी गुरू शिष्य परंपरेतून यापूर्वी विद्यार्थी घडायचे आज ज्ञार्नाजनाच्या विविध माध्यमातून विद्यार्थी घडत आहेत. पालकांच्या यापुर्वीच्या अपेक्षांमध्ये सुध्दा मोठे परीवर्तन झाल्याने शिक्षणाचा विस्तार वाढत असून अनेक क्षेत्र त्याच्यासाठी खुले झाले असल्याने परीश्रम, जिद्द व निर्भय होत आपल्या आवडीच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश घेवून विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य घडवावे असा हितोपदेश त्यांनी दिला.

डॉ. कितीवर्धन दिक्षीत यांनी आपल्या प्रगतीचा वेग थांबवू नका असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी यशाची ग्वाही देण्याचा संकल्प बाळगतांनाच सातत्य व अविश्रांत मेहनत हे तत्व अंगीकारल्यास यश आपलेच आहे असे सांगितले.

शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा हंसराज अहीर व उपस्थित अतिथींनी स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व भेट वस्तु देवून गौरव केला. Hundreds of meritorious students honored with commemorative medals

प्रारंभी पाहुण्यांनी भारत मातेचे दीप प्रज्वलन करून पूजन केले कार्यकमाचे संचालन व आभार प्रदर्शन विकास खटी यांनी केले. कमल कजलीवाले, मयुर भोकरे, राहुल सुर्यवंशी, प्रतिक शिवनकर, आशय चंदनखेडे, रोहीत खेडेकर, जितु शर्मा, योगेश विधाते, पराग मलोडे, नंदु बगुलकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले.

सदर कार्यक्रमास भाजपा, भाजयुमो, कमल स्पोर्टीग क्लबचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक व शिक्षकवृंद बहुसंख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular