Saturday, January 18, 2025
HomeAcb Trapगांजा विक्रेत्याला मोटरसायकल सह अटक : स्थानिक गुन्हे शाखेची फिल्मी स्टाईल कारवाई

गांजा विक्रेत्याला मोटरसायकल सह अटक : स्थानिक गुन्हे शाखेची फिल्मी स्टाईल कारवाई

Marijuana trafficking arrested with motorcycle

चंद्रपूर :- जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री व सेवनाचा प्रकार वाढत असून यावर प्रतिबंधित कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवत Drug trafficking जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या जिवती तालुक्यात फिल्मी स्टाईलने धाड टाकत अंमली पदार्थ ‘गांजा’ विक्री करणाऱ्या दोन तस्करांना अटक करीत 13.835 ग्रॅम गांजा आणि वापरती मोटर सायकल असा एकूण 2,45,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Marijuana traffickers arrested

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवैध प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अंमली पदार्थ गांजा अश्या पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांवर कारवाईची विशेष धडक मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
याच अनुषंगाने LCB स्थानिक गुन्हे शाखेला दिनांक 2 जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली की काही इसम जिवती वरून दुचाकीने राजुरा येथे गांजा विक्री करिता आणणार आहेत यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राजुरा तालुक्यातील भेंडवी फाटा येथे सापळा रचून दबा धरून बसले दरम्यान दुचाकीने संशयित येताच त्याचेवर फिल्मी स्टाईलने पाठलाग करीत छापा टाकत झडती घेतली असता त्याचे जवळ पोत्यामध्ये 13.835 कि. ग्रॅम गांजा आढळून आला यावरून आरोपी देवराव केसगीर रा. पल्लेझरी, ह. मु. शेणगाव, ता. जिवती व दिनकर कुळसंगे रा. खडकी, ता. जिवती या दोघांना ताब्यात घेत गांजा व वापरती मोटरसायकल असा एकूण 2,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीना पुढील तपासाकरिता राजुरा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले. Chandrapur Crime

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, शिवाजी कदम, पोलीस निरीक्षक, पोस्टें गडचांदूर यांचे नेतृत्वात सपोनि दिपक काँक्रेडचार, पोऊपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोहवा किशोर वैरागडे, दिपक डोंगरे, संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे, दिनेश आराडे आदी स्वागुशा चंद्रपुर यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular