Leopard entered Chandrapur city, MLA Kishore Jorgewar on the spot
Instructions to imprison leopards while increasing security
चंद्रपूर :- शहरातील बिनबा गेट परिसरात बिबट Leopard enter in Chandrapur city शिरल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार ऑन द स्पॉट दाखल झाले असून, सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. येथे जमलेली गर्दी पाहता, सुरक्षा वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या असून, बिबटला जेरबंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी विभागीय एसीएफ आदेश शेणगे, वन अधिकारी प्रशांत खाडे, वन अधिकारी नायगमकर यांच्यासह पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.
पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिनबा गेट लगत असलेल्या झाडी -झुडपांमध्ये बिबट वावरत असल्याचे काही नागरिकांना दिसले. याची माहिती लगेच वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिस विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोबतच याची माहिती आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांना पोहोचताच ते मुंबईहून थेट घटनास्थळी पोहोचले. सध्या बिबटला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. रेस्क्यू पथकही येथे दाखल झाले आहे. येथे होत असलेली नागरिकांची गर्दी पाहता दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. या सर्व कार्यवाहीवर आमदार किशोर जोरगेवार स्वतः लक्ष ठेवून असून, त्यांच्या वतीने प्रशासनाला योग्य सूचना करण्यात येत आहेत.
त्यांनी दूरध्वनीवरून पोलिस अधीक्षकांशीही संपर्क साधत पोलीस विभाग यासंदर्भात अनेक सूचना केल्या आहेत. येथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात यावा, काही भाग प्रतिबंधित करण्यात यावा, अशी सूचना यावेळी त्यांनी पोलिस अधीक्षकांना केली आहे. तसेच तहसीलदार आणि वन विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांशीही ते सतत संपर्कात आहेत.
नागरिकांना कोणतीही हानी न होता नियोजनबद्ध पद्धतीने बिबटला जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत असून, आपण स्वतः येथे उभे राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.