Tuesday, March 25, 2025
HomeCrimeओयो (oyo ) अणि खाजगी निवासी हाटेल्समध्ये अल्पवयीन मूलांमूलींना प्रवेश बंद करा

ओयो (oyo ) अणि खाजगी निवासी हाटेल्समध्ये अल्पवयीन मूलांमूलींना प्रवेश बंद करा

Ban the entry of minors in all oyo and private residential hotels in Chandrapur district

चंद्रपूर :- महिलांवर आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला असुन महिला सुरक्षतेचा खुप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

बदलापूरच्या थरारक प्रसंगानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर, नागभीड येथील महिलांवर झालेल्या घ्रृण कृत्यानी संपूर्ण जिल्ह्यातील महिला भयभीत झाले असून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या आया – बहिनींना सुरक्षीत जीवन कधी येणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अल्पवयीन मुलीला चॉकलेट – खाऊ अशा प्रकारचे आमीश दाखवून राक्षसी वृत्तीचे मानवजातीचे जणावर त्यांच्यावर बळजबरी करतात या प्रकारावर आळा घालण्यासाठी महिला व अल्पवयीन मुलीच्या सुरक्षतेसाठी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

नुकत्याच झालेल्या घटणा या ओयो हॉटेल मध्ये घडल्या असुन यावर वेळीच ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. आपण आपल्या स्तरावर जिल्ह्यातील सर्व ओयो हॉटेल्सची Oyo Hotels चौकशी करून अल्पवयीन मूलामुलींना प्रवेश बंदि करावी, अन्यथा MNS मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार असुन याला सर्वस्वी संबंधीत प्रशासन जबाबदार असेल असे निवेदन मनसे च्या माध्यमातून अप्पर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. Ban the entry of minors in all oyo and private residential hotels

यावर उपअधिक्षक रिना जनबंधू मॅडम यांनी सकारात्मक उत्तर देत सांगितले की आम्ही लवकरात लवकर ही मोहीम सुरू करू अणि कठोर कारवाई करू अशे आश्वासनं दिले. Maharashtra Navnirman Sena

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार यांच्या मार्गदर्शनात मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगूलवार आणि मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे ,माजी जिल्हा अध्यक्ष सुनिताताई गायकवाड, माजी नगरसेविका सिमाताई रामेडवार, जिल्हा सचिव अर्चना आमटे, बल्लापुर तालुका अध्यक्ष कल्पनाताई पोतर्लावार, अजय अल्लेवार, मंगेश धोटे, विशाल मत्ते, निक्की यादव, अवधुत मेश्राम, उज्वल तेलतुमडे, शुभम वांढरे आदी मनसेचे पदाधिकारी तथा मनसैनिक उपस्थीत होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular