LCB raid on illegal Cock Fighting Market
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर LCB Chandrapur च्या पथकाने कोरपणा तालुक्यातील लोणी गावालगत अवैधरित्या सुरु असलेल्या कोंबडा बाजारावर धाड टाकीत कोंबड्याच्या लढतीवर जुगार खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेत रोख रक्कम, जिवंत कोंबडे व मोटरसायकल असा एकूण 2,45,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. LCB raid on illegal Cock Fighting Market
कोरपणा तालुक्यातील लोणी गावालगत अवैधरित्या कोंबडा बाजारात लढतीवर जुगार खेळल्याजात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली यावरून पथकाने कोंबडा बाजारावर छापा मारत अमोल खरवडे (40), संजय क्षीरसागर (29), अनिल बेलेकर (54) व राजेंद्र खीरटकर (46) यांना ताब्यात घेतले तर इतर व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाले. ChandrapurToday Crime
वरील चौघाकडून रोख रक्कम 3600 रुपये, 4 जिवंत झुंज करणारे कोंबडे व 4 मोटरसायकल असा एकूण 2,45,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत चौघाविरुद्ध कोरपना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहेत.
सदर कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्था.गु.शा चंद्रपूर यांचे नेतुत्वात स.पो.नि दिपक कांकेडवार, बलराम झाडोकार पो. उप.नि. संतोष निंभोरकर, पोहवा किशोर वैरागडे, अजय बागेसर, जय सिंग, संतोष येलपुलवार, प्रमोद कोटनाके, मिलिंद जांभुळे, दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी कारवाई केली.
Local Crime Branch Chandrapur raided an illegal cock market near Loni village in Korpana taluka and arrested four people who were gambling on cock fights and seized a total of Rs 2,45,800 worth of cash, live chickens and motorcycles.
