Janakrosh Morcha of Bahujan Samata Parv with the questions of common people
participate in the march Appeal by Dr.Dilip Kamble
चंद्रपूर :- चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात जनसामान्यांच्या समोर समस्यांचा डोंगर उभा आहे. यामध्ये गरीब जनता, एससी, एसटी, ओबीसी, माईनॉरीटी जनता हाल_बेहाल होत आहे. या समस्या बद्दल बोलण्यास अथवा त्या समस्या दूर करण्यास लोकप्रतिनीधी तथा जिल्हा, नगर प्रशासन असमर्थ दिसत आहे.
या असंवेदनशील प्रशासनाच्या विरोधात तसेच सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने बहुजन समता पर्व तर्फे बुधवार 28 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता गांधी चौक ते जिलाधिकारी कार्यालय पर्यंत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहीती बहुजन समता पर्व चे मुख्य संयोजन तसेच कांग्रेस चे जेष्ठ नेता डॉ. दिलीप कांबळे यांनी श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषद मध्ये दिली.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात सर्वच झोपडपट्टी धारकांना स्थायी पट्टे मिळायला हवे, प्रधानमंत्री शहरी आवास योजने अंतर्गत महानगरपालिका हद्दीतील ओबीसी बांधवांचे पट्टे अभावी रोखुन ठेवलेले घरकुल पट्याची अट रद्द करून त्यांना त्वरित घरकुल योजना मंजुर करावी, महानगरपालिकेच्या अमृत जल योजना अंतर्गत येणारे पिण्यांचे पाणी हे चंद्रपूर वासियांना 24 तास मुबलक प्रमाणात देण्यात यावे, विद्युत बिलात कमीत कमी 25% कपात करून बिल देण्यात यावे,
महानगरपालिका व जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या बंद पडलेल्या प्राथमिक शाळा पुर्ववत सुरू कराव्या, बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम त्वरित पुर्ण करून हा पुल जनतेसाठी सुरू करण्यात यावा, शहरात फोफावणा_या अपराधीक घटना यावर नियंत्रण आणून हे अपराध घडवून आणणाऱ्या अपराध्यांवर अंकुश लावणे तसेच याला कारणीभूत अंमली पदार्थ तस्करी यावर तत्काळ निर्बंध लावावे, स्थानिक उद्योगों मध्ये स्थानिकांना 50 टक्के आरक्षण देण्यात यावे अशा प्रमुख मागण्या मोर्चाच्या माध्यमाने शासन प्रशासन पर्यंत पोहचविण्यात येणार असल्याची माहिती डा. कांबळे यांनी पत्रपरीषदेत दिली.
‘आता नाही तर कधीच नाहीं’ या भावनेने निघणा_या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहन्याचे आवाहन बहुजन समता पर्वाचे मुख्य संयोजक व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ता डॉ. दिलीप कांबळे यांनी केले आहे.
पत्रपरीषदेला बहुजन समता पर्व चे मुख्य संयोजक तसेच कांग्रेस चे वरिष्ठ नेता डॉ. दिलीप कांबळे, बहुजन समाज पर्व च्या सचिव एड. वैशाली टोंगे, सदस्य एड. मनोज कवाडे, विनोद लभाणे, सामाजिक कार्यकर्ता राहुल देवतळे आदि उपस्थित होते.