Tuesday, March 25, 2025
HomeAgricultureविविध कृषी पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

विविध कृषी पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

Applications invited for various agricultural awards

चंद्रपूर :- कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषी उत्पादक आणि उत्पन्न वाढीकरीता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/ संस्था/गट यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी /कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सन 2023 या वर्षामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती/गट/ संस्था यांचे उपरोक्त प्रमाणे विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी /गट संस्था/ व्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावे, असे आवाहन कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी केले आहे.

विविध कृ‍षी पुरस्कार प्रस्ताव तयार करण्याकरीता अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular