Friday, April 17, 2026
HomeAgriculture'श्री सिमेंट' विरोधात ग्रामस्थांचा एल्गार

‘श्री सिमेंट’ विरोधात ग्रामस्थांचा एल्गार

Villagers protest against ‘Shri Cement’ in Kondhala-Yensa

चंद्रपूर :- वरोरा  तालुक्यातील कोंढाळा – येन्सा येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्या आणि ‘श्री सिमेंट’ कंपनी संदर्भात निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. Villagers protest against ‘Shri Cement’ in Kondhala – Yensa

या बैठकीत ग्रामपंचायतीच्या नियमांना डावलून कंपनीला बेकायदेशीरपणे देण्यात आलेली ५० वर्षांची ‘अनापत्ती प्रमाणपत्र’ तात्काळ रद्द करण्याचे निर्देश खासदारांनी प्रशासनाला दिले. “लोकशाहीत ग्रामसभेचे अधिकार सर्वोच्च असून ग्रामसभेच्या निर्णयाचा आदर करणे प्रशासनाला बंधनकारक आहे,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. MP Pratibha Dhanorkar’s directive to cancel 50-year-old NOC

बैठकीत कोंढाळा गावाचे नियमानुसार पूर्ण पुनर्वसन आणि स्थानिक सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने मांडण्यात आला. कंपनीने बाहेरील कामगारांऐवजी स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणे अनिवार्य असून, पुनर्वसनाची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करावी, असा खंबीर पवित्रा खासदार धानोरकर यांनी घेतला. तसेच, आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या निष्पाप ग्रामस्थांवर कंपनी प्रशासनाने सूडबुद्धीने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.

या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून बाधित ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. प्रशासनाने ग्रामस्थांच्या भावनांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी संदीप  मस्के, तहसीलदार योगेश कौटकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कोंढाळा-येन्सा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular