Thursday, April 16, 2026
HomeHealthइनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूरकडून ‘प्यार फाउंडेशन’ ला १ लाखांची औषध...

इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूरकडून ‘प्यार फाउंडेशन’ ला १ लाखांची औषध देणगी

Innerwheel Club of Smart City Chandrapur donates Rs 1 lakh worth of animal medicine to ‘Pyaar Foundation’

चंद्रपूर :- इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटी, चंद्रपूरच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. शहरातील ‘प्यार फाउंडेशन’ या भटक्या आणि आजारी प्राण्यांच्या सेवेसाठी काम करणाऱ्या संस्थेला प्राण्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी १ लाख रुपयांची औषधे देणगी स्वरूपात भेट देण्यात आली. Innerwheel Club of Smart City Chandrapur donates animal medicine to ‘Pyaar Foundation’

इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर च्या प्रकल्प संचालिका चंदा खांडरे यांनी पशूंसाठी औषधे दान करत संस्थेच्या वैद्यकीय व पुनर्वसन उपक्रमांना पाठिंबा दिला. या उपक्रमाला इनरव्हिल क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर क्लबच्या अध्यक्षा सोनम कपूर, जिल्हा अध्यक्षा रमा गर्ग, पूनम कपूर, शाहीन शफीक, उमा जैन, सीमा गर्ग, सुनीता जयस्वाल, मीना अडवाणी आणि श्रीमती गुप्ता यांचीही उपस्थिती होती.

प्यार फाउंडेशन PYAAR FOUNDATION हे चंद्रपूरमधील एक अग्रगण्य प्राणीसेवा केंद्र असून, भटक्या प्राण्यांना निवारा, उपचार व पुनर्वसन सेवा देण्याचे कार्य अत्यंत समर्पित भावनेने करत आहे. मात्र, सतत वाढणाऱ्या गरजा आणि मर्यादित साधनसामग्रीमुळे अशा मदतीची त्यांना नेहमीच आवश्यकता असते. Innerwheel Club of Smart City Chandrapur

आजची ही देणगी मोहीम प्राण्यांप्रती माणुसकीचा सकारात्मक संदेश देते आणि सामाजिक संस्थांनी अशा सेवाभावी कार्यासाठी पुढाकार घेण्याचे उदाहरण ठरते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular