Thursday, April 16, 2026
HomeSocialचंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा शुक्रवारी कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळा

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा शुक्रवारी कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळा

Chandrapur Labour Journalists Association’s Karmaveer Award distribution ceremony on Friday

चंद्रपूर :- चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूरच्या वतीने शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार दिन व कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. Chandrapur Labour Journalists Association’s Karmaveer Award

वरोरा नाका पत्रकार संघाचे कार्यालय येथे आयोजित सोहळ्यात वरोरा येथील जेष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी व बल्लारपूर येथील जेष्ठ पत्रकार मंगल जीवने यांना कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उ‌द्घाटक व मार्गदर्शक म्हणून दैनिक नवराष्ट्रचे वृत्त संपादक डॉ.प्रा.गणेश खवसे व प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूरचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular