Saturday, September 26, 2026
HomeEducationalजिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत इन्फंट काँन्व्हेंट च्या मुलींची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत इन्फंट काँन्व्हेंट च्या मुलींची चमकदार कामगिरी

चंद्रपूर :- सेंट पॉल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बामणी येथे आयोजित जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत इन्फंट जीजस स्कूल (स्टेट), राजुरा येथील U-17 मुलींच्या संघाने दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या स्पर्धेत विविध विद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. Infant Convent girls put up a brilliant performance at the district-level Dodgeball tournament

इन्फंट जीजस स्कूलच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळकौशल्य, शिस्त, आत्मविश्वास आणि सांघिक भावना यांचे प्रभावी प्रदर्शन केले. प्रतिकूल परिस्थितीतही एकजुटीने खेळ करत संघाने उपविजेतेपद मिळविले.

रेल्वे कॉलनीतील मोकाट अस्वल अखेर जेरबंद…..

संघातील सौंदर्य सुभाष सुमटकर, श्रावणी विलास ढेंगरे, हरण्या सुरज दोनतावर, स्नेहल भास्कर मुसले, खुशाली श्रीकांत कुकडे, शर्वरी चंद्रशेखर कावले, शर्वरी ऋषी रागीट, पूर्वी योगिदास बोबडे, प्रणाली किशोर दिवसे आणि पालक प्रवीण चिंचोलकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अभिजित सुभाष धोटे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफीक अंसारी, तसेच क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे व हर्षल क्षीरसागर यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

क्रीडा शिक्षक रोहित शर्मा आणि सहायक शिक्षिका कु. अर्पणा येरकला यांच्या मार्गदर्शन व प्रशिक्षणातून विद्यार्थिनींनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular