Friday, September 25, 2026
HomeCrimeसिंदेवाहीत गणेश मंडळावर गुन्हा

सिंदेवाहीत गणेश मंडळावर गुन्हा

चंद्रपूर :- गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशरमिडचा वापर केल्याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी कारवाई करत DJ डिजे मालकासह गणेश मंडळाच्या कार्यकारिणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत डिजे, वाहनांसह एकूण १५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Ganesh Mandals DJ System seized

सिंदेवाही तालुक्यातील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना डिजेमध्ये प्रतिबंधित प्रेशरमिडचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत जप्ती पंचनामा करून संबंधित साहित्य ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे अपराध क्रमांक ५७०/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील कलम २२३, ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३८(१), १३६ व ७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार यांच्यासह पोलीस अंमलदार संजय जुगनाके, नारायण येगेवार, शुभम उराडे, कमलेश फेंडर, सुनील बहेकार आणि नंदकिशोर तुमराम यांनी कारवाईत सहभाग घेतला.
प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular